अमीर खानचा नवा लुक तुम्हाला कसा वाटला ???

0
547

मुंबई,(पीसीबी): मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक लीक झाला होता. त्यानंतर आता आमीर खानचादेखील फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता आमिर खान हा त्याच्या प्रत्येक चित्रपटाच तितक्याच वेगळ्या रुपात दिसतो. प्रत्येक वेळी एका नव्या भूमिकेचा स्वीकार करत आमिर ती मोठ्या ताकदीने साकारतोही. सोशल मीडियावर सध्याच्या घडीला व्हायरल होणाऱा आमिरचा फोटोही सध्या हीच बाब अधोरेखित करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत आमीर खान लाल सिंग चड्ढा लूकमध्ये दमदार दिसतो आहे. त्याने लाइट पर्पल रंगाचा ग्रे पॅण्ट परिधान केली आहे. तसेच त्याने पर्पल रंगाची पगडीदेखील बांधली आहे. सरदार लूकमध्ये आमीर खानला ओळखणं कठीण जात आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग चंदीगढमध्ये सुरू आहे.

अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा चित्रपट पुढील वर्षी क्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. लाल सिंग चड्ढा चित्रपट “फॉरेस्ट गंप” या हॉलिवूडचा रिमेक आहे.