युपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ   

0
599

भोपाळ, दि. १८ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील नोकऱ्या  युपी-बिहारमधील लोक बळकावतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे,  असे मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील उद्योग व्यवसायात ७० टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर स्वाक्षरी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जर गुंतवणूक करणारे उद्योग, कंपनी मध्य प्रदेशातील ७० टक्के लोकांना रोजगार देणार असेल, तरच त्यांना सवलत दिली जाईल, असेही कमलनाथ यांनी यावेळी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधूनल लोक येतात आणि नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. यामुळेच मी या नव्या नियमाच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन तासातच कमलनाथ यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. सध्या शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात  येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यामुळे ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.