‘या’ देशात सेक्स करण्यासाठी सहमती देणारं अॅप्लिकेशन लाँच

0
457

विदेश,दि.०७(पीसीबी) – अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांनंतर एक महत्त्वाची गरज म्हणजे सेक्स. पण, लैंगिक संबंधांमध्ये अनेक पैलूंचा समावेश होतो. त्यात जर ते संबंध सहमतीने झाले नसतील तर बलात्कारासारखा गंभीर गुन्हाही घडतो. हे टाळण्यासाठी एका देशाने सेक्ससाठी सहमती विचारणारं अॅप्लिकेशन लाँच केलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डेन्मार्क या देशाने हे अॅप्लिकेशन लाँच केलं आहे. आय कन्सेंट या नावाचं हे अॅप्लिकेशन लोकांना सेक्ससाठी सहमती विचारता तसेच देता यावी यासाठी बनवण्यात आलं आहे. डेन्मार्कमध्ये गेला काही काळ बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी हे अॅप्लिकेशन बनवण्यात आलं आहे.

हे अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर याचा युजर फक्त एका क्लिकने सेक्ससाठी आपली सहमती नोंदवू शकतो. ही सहमती फक्त 24 तासांसाठीच वैध राहील. या दरम्यान त्याला वाटलं तर तो त्याची सहमती मागेही घेऊ शकतो. जर दोन्ही बाजूंनी सहमती असेल तर आणि तरच हा सहमतीचा शरीरसंबंध मानला जाईल. अन्यथा त्याला बलात्कारच मानण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसंच हे अॅप निर्माण करणाऱ्यांनी अॅपचा वापर लैंगिक आरोग्याविषयीच्या समस्या आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांसाठीही होणार आहे. पण विशेष म्हणजे तिथल्या नागरिकांना हे अॅप्लिकेशन खास वाटलेलं नाही. त्यांनी या अॅप्लिकेशनमध्ये अनेक त्रुटी असल्याचं म्हटलं आहे. डेन्मार्कच्या संसदेने डिसेंबर महिन्यात एक कायदा पारित केला. त्या कायद्यानुसार, सहमतीशिवाय सेक्स करणंही बलात्कार आहे.