मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला अमित शहांना बोलावण्यामागे ‘हे’ कारण…

0
214

सिंधुदुर्ग, दि. ७ (पीसीबी) ”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असंही भाजप नेते नारायण राणे म्हणाले आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर आहेत. त्यावेळी नारायण राणे बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 650 बेड्सचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तयार केलंः- राणे
अमित शाह यांना उद्घाटनाला बोलावण्यामागे आमच्या काही भावना आहेत. आम्ही जंगलात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 650 बेड्सचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तयार केलं. आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरु करण्याचं धाडस केलं. त्यासाठीदेखील तशाच धाडसी माणसाच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं. त्यासाठीच मी दिल्लीत गेलो. त्यांना सांगताच, त्यांनी येणार असं आश्वासन दिलं. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी गेल्या अनेक वर्षात राज्यभरात भरपूर काम केलंय, असंही राणे म्हणालेत.

भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केलीय. विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. नारायण राणे म्हणाले, “या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून खूप विरोध झाला. शिवसेनेने याला खूप विरोध केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी या ठिकाणी नवं रुग्णालय उभारणार आणि त्यासाठी 900 कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. मात्र, तिजोरीत एक पैसा नाही आणि चालले 900 कोटी रुपये द्यायला.” “कोकणात विमानतळ होणार होतं तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकास कामांना विरोध करायचा आणि उद्धाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं येऊन बसायचं यालाच शिवसेना म्हणतात,” असंही मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.