“या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल”

0
184

मुंबई,दि.०९(पीसीबी) – भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. तर 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे.

‘भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात 10 नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’ असे ट्विट करत रोहित पवार यांनी आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुख: व्यक्त केले असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना चौकशाचे आदेश देण्यात आले आहे. टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली आहे. भंडाऱ्यातील या घटनेने संपुर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून, आमदार रोहित पवार यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे.