भंडाऱ्यातील घटनेबाबत पंतप्रधानांनी ट्विट करत व्यक्त केले दुख:

0
217

नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) – भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. तर 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीव्र दुख: व्यक्त केले असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना चौकशाचे आदेश देण्यात आले आहे. टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली आहे. भंडाऱ्यातील या घटनेने संपुर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या घटनेबद्दल दुख: व्यक्त केला आहे.

मोदी यांनी ट्विट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यांनी आपल्या ट्विटर संदेशात लिहले आहे की, ‘महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवजात बालकांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत’ असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.