…यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधींनी स्वत:ची ताटं धुतली

0
424

वर्धा, दि. २ (पीसीबी) – वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये जेवणानंतर स्वत:चे ताट स्वत: धुण्याची पूर्वापार पद्धत सुरू आहे. स्वावलंबनाचा हा मार्ग महात्मा गांधी यांनी आखून दिला होता. हा मार्ग आज (मंगळवार) काँग्रेसच्या नेत्यांनाही पत्करावा लागला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेवणाची ताटं स्वत:च्या हाताने धुतली.

वर्ध्यात सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला आज सुरूवात झाली. तत्पूर्वी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी जेवण झाल्यानंतर आपली ताटे स्वत: घुऊन गांधींच्या शिकवणीचे आचरण केले.

दरम्यान, भरदुपारी तीनच्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधींच्या हातत हात देण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे ५३ सदस्य उपस्थितत होते.