…यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधींनी स्वत:ची ताटं धुतली

0
389

वर्धा, दि. २ (पीसीबी) – वर्ध्यातील आश्रमामध्ये जेवणानंतर स्वत:चे ताट स्वत: धुण्याची पूर्वापार पद्धत सुरू आहे. स्वावलंबनाचा हा मार्ग महात्मा गांधी यांनी आखून दिला होता. हा मार्ग आज (मंगळवार) काँग्रेसच्या नेत्यांनाही पत्करावा लागला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेवणाची ताटं स्वत:च्या हाताने धुतली.