यशवंतनगर पुनर्वसन प्रकल्पाची चौकशी करा; बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
439

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – यशवंतनगर पुनर्वसन प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकचा टी डी आर लाटण्याकरिता बोगस झोपडीधारकांची नावे वाढविल्याने सदरच्या विकासकास साई मिराकल यांना काळ्या यादीत समावेश करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच कार्यालयीन 15 दिवसात सदर विकसक (बिल्डर )विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास एस.आर.ए पुणे येथे धरणे /निदर्शने आंदोलन चा इशारा झोपडपट्टी समस्या निवारण समिति व इतर विविध पक्ष संघटनेने दिला आहे.

“पिंपरी चिंचवड मधील यशवंतनगर झोपडपट्टी पुनर्वसन जाहीर झाले तेव्हा पासूनच ते वादात आलेले आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे मर्जीतील विकासकास साई मिराकल यांना त्या ठिकांनी घुसखोरी करीत आणले ,स्थानिक रहिवाशांचा प्रचंड विरोध होता ,10 * 10 च्या एका झोपडीत 4 बाजूने दरवाजे असल्याचे दाखवून एका दरवाजास एक फोटो पास देण्याचे कारस्थान करण्यात आले. ज्याठिकणी पुनर्वसन होणार होते त्या ठिकाणी मनपा चे बेघरांसाठी घरे असे आरक्षण होते ते आरक्षण आज पर्यंत बद्ल्ण्यात आलेले नाही . 166 झोपड्या मनपाचे दफ्तरी नोंद असताना पुनर्वसन बाबत ठरताच तेथे 300+झोपड्या झाल्या . बांधकाम परवानगी व इतर परवानग्या नसतानाही बांधकाम सुरू करण्यात आले ,या एक ना अनेक तक्रारी असतांनाही पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्याची घाई का करण्यात आली?” असा सवाल झोपडपट्टी समस्या निवारण समितिचे अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी केला आहे

या प्रकरनाची चौकशी पूर्ण होत नाही ,मनपा व एस.आर.ए वतीने संयुक्त सर्व्हे करण्यात येऊन मूळ झोपडी धारकांना घरे मिळवीत हाच हेतु असून हे काम पूर्ण होत नाही तोवर विकासकास साई मिराकल यांना टी डी आर देऊ नये,सदरचे प्रकरण होल्ड वर ठेवावे अशी विनंती कांबळे यांनी केली असून सदरचे प्रकरणाचा छडा 15 कार्यालयीन दिवसात लावला नाही तर झोपडपट्टी समस्या निवारण समिति व इतर विविध पक्ष संघटने मार्फत आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे