मोहिते-पाटील पितापुत्रांचे पुनर्वसन; राज्यसभा, विधानपरिषद मिळणार?  

0
624

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यासाठी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीच पवारांना गळ घातली आहे. पवारांसाठी माढ्याची जागा सोडण्याची तयारी मोहिते पाटील यांनी दाखवली आहे.   

त्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थ पसरली होती.  परंतु, आता विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवून  नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, याबाबत शरद पवारच  पुढाकार घेणार आहेत, अशी   माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

माढा लोकसभेचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर  तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवून त्यांच्या गटाचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राकडून मिळत आहे.