मोशीत देशी दारुच्या दुकानात चोरी; रोख रकमेसह दारुच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास

0
588

मोशी, दि. ३० (पीसीबी) – देशी दारुचे दुकान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील ६ हजारांची रोख आणि ३०० रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. ही घटना रविवारी (दि.२८) रात्री दहाच्या ते सोमवार (दि.२९) सकाळी आठच्या दरम्यान मोशीतील तापकीरनगर येथील राजपुत देशी दारुच्या दुकानात घडली.

याप्रकरणी सोमनाथ महारुद्र्या स्वामी (वय ३२, रा. शिवशंकरनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ यांचे मोशीतील तापकीरनगर येथे राजपुत नावाचे देशी दारुचे दुकान आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी गेले असता अज्ञात आरोपीने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील ६ हजारांची रोख आणि ३०० रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.