गणेश नाईकांच्या प्रवेशामुळे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे नाराज

0
500

नवी मुंबई, दि.३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि ५७ नगरसेवकांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, यावर  बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली  असून त्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

गणेश नाईक हे स्वतःचे साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत. ही त्यांची स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्कीच न्याय देतील, असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, म्हात्रेंची नाराजी दूर करण्यास भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रेंची भेट घेतली आहे. तसेच याबाबत  म्हात्रे या लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत, असे समजते.