मोदी सरकारचा दणका; सीबीआय संचालक आलोक वर्मांची उचलबांगडी   

0
477

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची  तडकाफडकी उचलबांगडी  करण्यात आली असून त्यांची केंद्रीय अग्निसुरक्षा विभागात महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे .  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे. वर्मा यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.