मोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत – सचिन तेंडुलकर

0
475

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष त्या विश्वचषक स्पर्धेकडे आहे. पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए च्या सरकारला निवडून दिले. ७ टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागला. यात जवळपास तब्बल ३५० जागांच्या जवळपास भाजपने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयनानंतर सर्व स्तरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या.

मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. “नरेंद्र मोदीजी, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला आणि भारतीय जनता पक्षाला मनःपूर्वक शुभेच्छा! उज्वल आणि सशक्त अशा नव्या भारताच्या बांधणीसाठी अख्खा देश तुमच्यासोबत आणि पाठीशी आहे”, असे ट्विट सचिनने केले आहे.