भोसरीत रिक्षाच्या शिफटचे पैसे न दिल्याने पंक्चर व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी वार

0
507

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – रिक्षाच्या शिफटचे पैसे न दिल्याने तिघाजणांच्या टोळक्यांनी मिळून पंक्चर व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी वार करुन गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास माऊली टि सेंटर शेजारील पंक्चरच्या दुकानात घडली.

गणेश किशोर लोंढे (वय २०, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे जखमी पंक्चर व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजु कांबळे (रा. मोहननगर, पिंपरी), विशाल कांबळे आणि बाळु या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे माऊली टि सेंटर शेजारी पंक्चरचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश हा त्याचे मित्र शंकर सुरवसे, विनोद विश्वकर्मा, गोट्या उर्फ पया कचरु ओव्हाळ यांच्यासोबत बसला होता. इतक्या तिघे आरोपी तेथे आले आणि गोट्या याच्या भावाने राजु याचे रिक्षाच्या शिफटचे पैसे न दिल्याचा जाब विचारल. तसेच त्यांना गणेश याचे पंक्चरचे दुकान हे गोट्याचे आहे असे वाटल्याने त्यांनी दुकानातील १५ हजारांची कॉम्प्रेसर मशीन जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला. यावर गणेश याने त्यांचा विरोध केला असता आरोपींनी गणेशवर धारदार शस्त्रांनी वार करुन गंभीर जखमी केले. आणि मशीन जबरदस्तीने चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक बांबळे तपास करत आहेत.