मोदींच्या हेलिकॉप्टरमधून बाहेर काढलेल्या बॉक्सची चौकशी करा – काँग्रेस

0
575

बेंगळुरू, दि. १४ (पीसीब) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक बॉक्स बाहेर काढण्यात आला आणि चारचाकीत ठेवण्यात आल्याचा एक व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत भाजपला कोंडीत पकडले आहे. या प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.    

काँग्रेसने शेअर केलेला कथित व्हिडीओ कर्नाटकमधील हेलिपॅडचा आहे. या व्हिडीओत एक काळा बॉक्स चारचाकीत ठेवताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॅण्डिंग करताच हा बॉक्स हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आला आणि चारचाकीत ठेवण्यात आला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

यूथ काँग्रेस मीडिया इन चार्ज श्रीवत्स यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांचा दावा आहे की, चित्रदुर्गा येथे नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरचे लँण्डिंग झाल्यानंतर हा व्हिडीओ काढण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुडू राव यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी  म्हटलेआहे की, ‘चित्रदुर्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक रहस्यमयी बॉक्स उतरवण्यात आला आणि एका खासगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला. ती कार लगेच तिथून निघून गेली. या बॉक्समध्ये काय होते आणि ही गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगाने केला पाहिजे.