छगन भुजबळांनी जाहीर केली महाआघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची नांवे

0
694

जळगाव, दि. १४ (पीसीबी) – सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप –प्रत्यारोपांची राळ उठवली जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पदासाठी उमेदवार जाहीर करा, असे आव्हान महाआघाडीला केले होते.  या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ  नेते छगन भुजबळ यांनी चोख  उत्तर दिले आहे.

महाआघाडीत पंतप्रधानपदासाठी  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपाच्या अध्यक्षा मायावती,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग  हे सक्षम उमेदवार आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. आघाडीकडे भाजपपेक्षा चांगली कामे करणारे उमेदवार आहेत, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी एका जाहीर सभेत महाआघाडीने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान दिले होते. महायुतीकडे मोदीसारखा कणखर पंतप्रधान आहे. तर महाआघाडीत पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले होते.