बारामतीत १९ एप्रिलला अमित शहांची तोफ धडाडणार

0
569

बारामती, दि. १४ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार  कांचन कुल यांच्या प्रचारार्थ बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  होणारी सभा रद्द झाल्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शहांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १९  एप्रिल रोजी  बारामतीत ही सभा होणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांची सभा बारामती मध्ये घेण्याची भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती,  मात्र देशभरातील प्रचारात व्यस्त  असल्यामुळे   मोदी  यांना या सभेसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे पुण्यात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत  अमित शहा यांच्या बारामती सभेची तारीख निश्चित  करण्यात आली.

दरम्यान,  अमित शहा बारामतीतील सभेत काय बोलणार याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच  गिरीश महाजन यांची देखील माळेगाव व सणसर येथे सभा होणार आहे. तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या ही दोन सभा  बारामती मतदारसंघात  घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मंत्री राम शिंदे यांचीही  बारामतीत  सभा होणार आहे.