मोठा ‘टाऊनशीप’ प्रकल्प पुण्यात उभारण्यात येईल,अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी – आव्हाड

0
730

पुणे, दि.८ (पीसीबी) – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले

आव्हाड म्हणाले, दीन-दुबळया, सोशितांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय राज्य शासन घेत आहे. गृहनिर्माण विभागातील प्रलंबित कामे गतीने मार्गी लावण्यात येत असून लवकरच स्वतंत्र बैठक घेवून पुणे एसआरएची प्रलंबित प्रकरणे गतीने मार्गी लावण्यात येतील. पुण्यासह राज्याचा नगर नियोजन आराखडा ठरविण्यात येणार आहे. झोपडपट्टी वासियांच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या असून प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत गोर-गरिबांना ३०० चौ.फूटाची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेप्रमाणेच एसआरए अंतर्गत इमारतींची उंची १०० मीटर ठेवण्याबाबतची परवानगी एसआरएला देण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व सोयी सुविधांयुक्त मोठा ‘टाऊनशीप’ प्रकल्प पुण्यात उभारण्यात येईल, असे सांगून यासाठी अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.