झोपडपट्टी धारकांच्या हितासाठी विकासकांनी पुढे यावे, समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी – निलम गोऱ्हे

0
451

पुणे, दि.८ (पीसीबी) – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या

झोपडपट्टी धारकांच्या हितासाठी विकासकांनी पुढे यावे, तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. राजेंद्र निंबाळकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती प्रास्ताविकातून दिली. झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाला व त्यांच्या विकासाला गती देण्याचे काम या कार्यालयाद्वारे होईल, असे ते म्हणाले.