मेरी कोमने रचला इतिहास; विश्वविजेतेपदाचा ‘षटकार’

0
486

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकणारी भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने आज इतिहास रचला. मेरी कोमने जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत युक्रेनच्या हॅना ओखोता हिला नमवित सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही मेरी कोमने आपल्या नावावर केला. मेरी कॉमने या विजयासह एकूण सात गोल्ड मेडल जिंकले आहेत. यात सहा सुवर्ण तर आयर्लंडची खेळाडू कॅटी टेलरसह मेरीची बरोबरी झाली होती. मेरीच्या खात्यात जागतिक स्पर्धेतील पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके होते. तर कॅटीच्या खात्यात पाच सुवर्ण आणि एक ब्राँझ अशी सहा पदके होती. मेरी कोमने या विजयासह कॅटीला मागे टाकले. मेरीच्या नावावर आता सहा गोल्ड मेडल झाले आहेत.

आता फक्त प्रश्न आहे तो ती कोणते पदक जिंकणार हा. जर तिने शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले तर ती पुरुषांशीही बरोबरी करणार आहे. क्युबाचा फेलिक्स सॅव्हन याच्याशी ती सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी खेळाडू म्हणून बरोबरी करणार आहे. सॅव्हनने तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या खात्यात सहा सुवर्ण आणि एक रौप्य आहे.