तरूणीकडे पाहत अश्लील हावभाव करून शिट्टी मारणाऱ्या तरूणावर देहूरोडमध्ये गुन्हा

0
1197

देहूरोड, दि. २४ (पीसीबी) – तरूणीकडे पाहत अश्लील हावभाव करून शिट्टी मारणाऱ्या एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणी मुस्ताक सलीम सय्यद (रा. शितळानगर, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित २३ वर्षीय तरूणी खडकीतील रहिवाशी असून तिने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१७ मध्ये आरोपीने तरूणीकडे पाहून अश्लील  हावभाव करत शिट्टी मारली. त्याचबरोबर तिच्या कंबरेला स्पर्श करून विनयभंग केला. याप्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.