“मुली नेहमी आनंदी रहा. जगाचे कल्याण करत रहा,” असे मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करून केले कौतुक

0
607

 

पुणे, दि.६ (पीसीबी) – कोरोनाशी सध्या सर्वच पातळीवरून लढाई सुरु आहे.कोरोना विरोधातील लढाईत प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने आपले योगदान देत आहे. मध्यप्रदेश येथील महिला पोलीस कर्मचारी सृष्टी श्रोतिया या डयुटी संपल्यावर राहिलेल्या वेळात मास्क शिवून योगदान देत आहेत.

सध्या मास्कचा तुटवडा जाणवत आहे. तर सृष्टी मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. कोरोना विरोधातील लढाईत त्या आपला खारीचा वाटा उचलत आहे.त्यांचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कौतुक केले आहे. “मुली नेहमी आनंदी रहा. जगाचे कल्याण करत रहा,” असे मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करून म्हटले आहे.

सागर जिल्ह्यातील खुरई ग्रामीण पोलीस स्टेशनला सृष्टी कार्यरत आहेत. सध्या पोलीस बंदोबस्ताच्या काळात त्याच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. ती पार पडल्यावर त्या घरी जाऊन मास्क शिवत आहेत. त्यांचा शिवणकामाचा कोर्स झाला आहे,त्या ज्ञानाचा या काळात समाजाला उपयोग व्हावा असं त्याच म्हणणं आहे. त्या मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. कोरोनाच्या लढाईत आपली नोकरी निभावत सामाजिक काम करत आहेत.

त्यांच्या या कामाची हकीकत संदीप सिंह यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्यांची माहिती ट्विटवर पोस्ट केली. त्यानंतर मुखमंत्री चौहान यांनीही सृष्टीचे कौतुक केले आहे. “मुली नेहमी आनंदी रहा. जगाचे कल्याण करत रहा.”असे त्यांनी म्हटले आहे.