#CoronaVirus | पिंपरी-चिंचवड मधील ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी क्वारन्टाईन

0
671

पिंपरी,दि.६(पीसीबी) – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दि. ३१ मार्च रोजी एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल करोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे त्या रिक्षाचालकांवर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.