मुख्यमंत्री करायचा असेल, तर दसरा मेळाव्यात ताकद दाखवा-शिवसेना

0
715

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल, तर दसरा मेळाव्यात ताकद दाखवून दिली पाहिजे. त्यामुळे ५ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेनेने आज (बुधवार) शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आणि रघुनाथ कुचिक आदी उपस्थित होते. तर ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक पालघर, रायगड, माव़ळ, उरण, भिवंडी मतदारसंघातून कार्यकर्ते आले होते. शिवतीर्थावर शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. निवडणुकीआधी दसरा मेळावा जोरदार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

देशाचा पंतप्रधान निवडायची जर वेळ आली. तर शिवसेनेची भूमिका महत्वाची असेल. भाजपला प्रत्येक शिवसैनिकाने ताकद दाखवण्यासाठी दसरा मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे. भाजपला शिवसेनेची ताकद शिवतीर्थावर दिसली पाहिजे, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.