मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात…

0
552

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – मुख्यमंत्रिपदाबाबत  चंद्रकांतदादा काय बोलले आहेत,  याची मला माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. तरीही सध्या मी मुख्यमंत्री आहे. आपल्या आशीर्वादाने मी कदाचित पुन्हा मुख्यमंत्री होईन. चंद्रकांत पाटील आताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना स्थिर होऊ द्या, असे सुचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी   पुण्यामध्ये बोलताना मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही. मी यापूर्वीही कोणत्याच पदाचा दावेदार नव्हतो. परमेश्वराच्या कृपेने पदे मिळाली. पक्ष देईल ते काम करायला मला आवडते. पक्षाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास मुख्यमंत्रीही होईन, असे  म्हटले होते.

या विधानावर  प्रतिक्रिया  देताना मुख्यमंत्री  फडणवीस  यांनी सध्या तरी मीच मुख्यमंत्री आहे. पाटील यांना स्थिरस्थावर तरी होऊ द्या, असे म्हटले आहे.

दरम्यान,  कितीही आमदार भाजपमध्ये आले तरी विधानसभा निवडणूक ही भाजप-शिवसेना युतीतून एकत्रितपणे लढविली जाईल. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल  पाटील म्हणाले की आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची क्षमता आहे की नाही, हे मतदारच ठरवतील.