हे सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून मंत्री हे झपाटलेल्या सिनेमातील कलाकार – सदाभाऊ खोत

0
320

पंढरपूर,दि.१(पीसीबी) – रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी “महाविकास आघाडी सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून मंत्री हे झपाटलेल्या सिनेमातील कलाकार आहेत. आपल्याच भातावर डाळ ओढण्याचं काम सध्याचं महाराष्ट्र सरकार करतंय”, अशी टीका राज्य सरकारवर केली आहे.

विरोधी पक्षाच्या दूध आंदोलनाच्या धर्तीवर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ घोटाळ्यास महाविकासआघाडी सरकार पाठीशी घालतंय. दुधाचे खाजगी प्रकल्प हे सरकारच्या संबंधित असून दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा अपुरी असल्याची टीकाही सदाभाऊ यांनी यावेळेस केली.

दरम्यान, तसेच सांगोला चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग यांच्या प्रतिकात्मक मूर्तीस अभिषेक घालताना पांडुरंगाकडे अनोखं साकडंही घातलं. या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावं..अन दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा…अशा सूरात त्यांनी पांडुरांगाला साकडं घालत सरकारला टोला लगावला आहे.