मुंबई सेंट्रल स्थानकाला बाबासाहेबांचं नाव दिलं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू – रामदास आठवले

0
315
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई,दि.१४(पीसीबी) – मुंबई सेंट्रल स्थानकाला बाबासाहेबांचं नाव दिलं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे.

बई सेंट्रल स्टेशनच्या नामकरणावरून वाद चिघळत चालला आहे. अशातच मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस सेक्युलर असेल तर आंबेडकराच्या नावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रान मोकळं मिळालं असल्याचं म्हणत आठवलेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर त्यांनी आपल्या गो कोरोनाच्या कवितेवर भाष्य केलं.

दरम्यान, आमचा कविता म्हणण्यामागे कोरोना विषाणू देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.