“कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण तयार करणार”

0
303

मुंबई,दि.१४(पीसीबी) – कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला ते बोलत होते.

राज्यातील शाळांमधील कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या नेमणुकीसाठी सर्वंकष असं धोरण तयार करण्यात येईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ या प्रणालीमार्फत करण्यात येते, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार पदभरती करण्यात येतात. आतापर्यंत मागणी केलेल्या ४८ क्रीडा शिक्षकांपैकी १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.