मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १० वाहने एकमेकांना धडकली; १ ठार

0
887

लोणावळा, दि. ६ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आज (गुरूवार) सकाळी झालेल्या या अपघातात १० वाहनांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. ५ कार, ४ ट्रक आणि एका टेम्पोची एकमेकांना धडक झाली. तर दुसऱ्या अपघातात एकूण ८ वाहने धडकली. 

खोपोलीनजीक ट्रकची कंटेनर ट्रेलरला धडक झाली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्या अपघातात चार वाहनांची एकमेकांना धडक बसली. त्यानंतर दोन कार आणि दोन ट्रकची धडक झाली.

या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात कशामुळे झाला, अपघाताला कोण कारणीभूत होते? याबाबत समजू शकलेले नाही. मात्र, असा विचित्र अपघात होऊन तब्बल १० वाहने एकमेकांना धडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वेगवान वाहनावर ऐनवेळी नियंत्रण मिळवणे कठीण असते. जर गाड्या रांगेत असल्या आणि पुढच्या गाडीचा अपघात झाला, तर मागची वाहनेही येऊन धडकतात. असाच प्रकार आज झालेला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.