मी सात दिवसांचा असताना आईच्या काखोटीतून स्कुल बोर्डाच्या मिटींगला गेलोय – शरद पवार

0
399

मुंबई,दि.९(पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या अधिवेशनात आपल्या किशोर वयातील आणि सामाजिक आणि राजकीर्दीतले निवडक किस्से सांगितले.

यावेळी “शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचं आहे की माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी ७ दिवसांचा असताना मी आईच्या काखोटीतून स्कुल बोर्डाच्या मिटींगला गेलोय. त्यामुळे मला कमळ कसं दिसेल?” हा किस्सा सांगताच उपस्थितांमतध्ये हास्याचा कल्लोळ उठला.

ज्या काळात आम्ही एकत्र काम करत नव्हतो तेव्हा मी रोज सकाळी सामना वाचायचो. आज काय फटकारे लगावलं, आज काय टोला लगावला, आज काय चिमटा काढलाय हे पाहण्यासाठी मी सामना वाचायचो. त्यावेळी वाटायचं की यांना असं रोज कसं सुचतं? ते आत्ता कळलं की त्यांच्या पत्नी शिक्षिका आहे. त्या रोज जाब विचारत असतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.