“ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं”

0
627

बीड,दि.९(पीसीबी) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “भाजपचं सरकार आल्यावर मराठा समाजाला दोन वचनं दिली होती. एक होतं ते आरक्षणाचं आणि दुसरं अरबी समुद्रात शिवस्मारकाचं. ही दोन्ही आश्वासनं आम्ही पाळली आहेत. मात्र शिवस्मारकाचं काम ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं आहे” असा आरोप केला आहे.

लोकशाहीचं मूल्य या सरकारला मान्य नाही. मागिल तीन महिन्यात ठाकरे सरकारने फक्त एकच काम केलं आहे ते म्हणजे सुरळीत सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याचं. त्यामुळे हे प्रगती सरकार नाही तर स्थगिती सरकार आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीचं सरकार हे ऑटो रिक्षा सरकार आहे. हे तीन चाकाचं सरकार वेगवेगळ्या दिशेनं काम करत आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टीकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

दरम्यान, आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा जुन्या सरकारच्या चांगल्या योजनांना स्थगिती दिली नाही. उलट जनतेसाठी त्या सुरू ठेवल्या, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.