मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील तरुण उद्योगाच्या खूना प्रकरणी सातजणांना अटक

0
573

मावळ, दि.२४ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे ( दि. २२) शुक्रवार रोजी रात्री दहाच्या सुमारास एका तरुण उद्योजकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महेंद्र अरुण असवले यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यश रोहिदास असवले (वय 22, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) असे खून झालेल्या युवक उद्योजकाचे नाव आहे.

(१) ऋतिक बाळू आसवले (वय २० वर्षे, रा.टाकवे बुद्रुक, मावळ), (२)अजय बबन जाधव ( वय २४ वर्षे), (३) अतिश राजु लंके (वय २१ वर्षे, रा.वतननगर तळेगाव दाभाडे, ता.मावळ), (४) विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय २३ वर्षे रा. गुरुदत्त कॉलनी वराळे रोड तळेगाव दाभाडे), (५) ऋतिक कांताराम चव्हाण (वय १९ वर्षे रा.म्हाळसकरवाडा वडगाव मावळ, मावळ), (६) अश्विन कैलास चोरगे (वय २२ वर्षे रा.घोणशेत ता.मावळ), (७) निखील भाऊ काजळे (वय २० वर्षे रा.म्हाळसकरवाडा वडगाव मावळ, मावळ) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२२) शुक्रवार रोजी अंदाजे रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर यश हा महेंद्र अरुण असवले (वय ३५), निखिल सोपान भांगरे (वय३०) यांच्या सोबत रस्त्यावर फिरायला गेला होता. यावेळी टाकवे गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर असताना रात्री दहा ते सव्वादहाच्या दरम्यान तीन मोटारसायकल वरून पाठीमागून येऊन सात अज्ञात हल्लेखोरांनी यश याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घुण हत्या केली.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, तातडीने वडगाव पोलिसांनी पोलिस स्टेशनची २ पथके व स्थानिक गुन्हे अन्वे.शाखा पुणे ग्रामीण याचे एक पथक अशी तीन पथके तपास कामी रवाना केली. या पथकांच्या संयुक्त तपासणी दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी हे वडगाव मावळ डेक्कन हिल्सजवळ पाण्याच्या टाकीजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने सात आरोपींनी ताब्यात घेतले.आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनीच हा खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार आरोपींविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करीत आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पो.स.ई.दिलीप देसाई, पो.स.ई.शिला खोत, सहा. फौजदार विश्वास आंबेकर, सहा.फौज. कविराज पाटोळे, सहा.फौज. भाऊसाहेब कर्डीले, पोलीस नाईक गणेश तावरे, पोलिस नाईक मनोज कदम, पोलीस नाईक श्रीशैल कंटोळी, पोलीस नाईक रविंद्र राय, पोलीस नाईक दिलीप सुपे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सुपे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक गायकवाड, पोलीस कोन्स्टेबल प्रविण विरणक, वडगाव मावळ पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे स.पो.नि.ताटे, सहा.फौज .पाटील, पोलिस हवालदार वाघमारे, पोलीस नाईक महाडीक यांनी केली.