…तर मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपातीची वेळ येईल – संजय राऊत

0
312


मुबई, दि. २४ (पीसीबी) – कोरोनाच्या संकटामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सामनाच्या रोखठोक या सदरात त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे.

संजय राऊत म्हणतात, “महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.”


संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्याने एक मिश्किल भाष्य केले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? करोनामुळे आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.”


संजय राऊत म्हणतात, कोरोना काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. लोकांना विरोधकांना घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधी काम करत आहेत. मुख्यमंत्री टाळेबंदीच्याबाबतीत कठोर आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये ही त्यांची भूमिका आहे तर शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते निर्बंध शिथी व्हावेत असे म्हणतात. लोकांनी हळूहळू स्वतःची सुरक्षा सांभाळून कामधंद्यास लागावे या मताचे ते आहेत. कोरोनाच्या पेचा जनता अधूनमधून अस्वस्थ मनाचा उद्रेक घडवत आहे.
कोरोना संकटाने जगाचे संदर्भ बदलत चालले आहेत. जगात किमान २७ कोटी लोक अत्यंत गरीब होतील. त्यातले ६ कोटी लोक भारतात असतील. राम मंदिर, हिंदुस्थान पाकिस्तान, मुसलमान हे विषय मागे टाकून रोजगार व भूक या विषयांर जे बोलतील तेच लोकांचे पुढारी होतील.