धक्कादायक आज एका दिवसात पॉझिटिव्ह रूग्ण ४६

0
454

पिंपरी, दि .२३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराला आज कोरोना ने जोरदार धक्का दिला. एकाच दिवसात नवीन ४६ पॉझिटिव्ह रूग्ण आधळले. सायंकळी. सात वाजेपर्यंतच्या अहवालात आजपर्यंत एकूण कोरोना पॉझिटीव्ह ३११ असल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुर झाल्या नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच
आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण ४६ असल्याने सर्वाना मोठा धक्का बसला.
सध्या शहरातील कोरोना रूग्ण १११ आणि
उर्वरित शहराबाहेरील रूग्णालयात आहेत.

एकूण मृत संख्या १६ असून त्यात शहरातील
७ तर, ९ शहराबाहेरील आहेत.

एकूण कोरोनामुक्त रूग्ण संख्या १६९
आज दाखल संशयित रूग्ण संख्या १२० आहेत. तपासणीत निगेटिव्ह रूग्ण १२२ आढळलेत. अध्याप ३७७ रुग्णाच्या अहवालची प्रतिक्षा आहे.

एकूण होम क्वारंटाईन १० ४६१ आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण १,०५ ९७५ लोकांचे झाले आहे.

आजचे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, वाकड, भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकी पुणे येथील रहिवासी आहेत.

आज इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली व थेरगाव येथील रहिवासी असलेले ९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

आज मध्यरात्री ११ वाजलेपासून कंन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला तीन विभाग असे –
१) पिंपरी कॉलनी, पिंपरी (साई चौक – आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – डेरा संत बाबा हरिया सिंग दरबार – शाम सुंदर सुपर मार्केट – श्री मुद्रा गणेश मंदिर – गे लॉर्ड चौक – महादेव पॅटीस वाला – साई चौक)

२) वाकड पोलिस लाईन, वाकड (सिसिम स्ट्रीट स्कुल – श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड – श्री गणेश सुपर मार्केट – आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – सिसम स्ट्रीट स्कुल)

३) अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी (पी.एस. रेसिडन्सी – देविका स्टेशनरी – अलंकापुरम रोड – पदमावती दुध डेअरी – पी.एस. रेसिडन्सी) .