मावळ आणि शिरूरमध्ये भाजप ३ नोव्हेंबरला रणशिंग फुंकणार; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्राधिकरणात होणार सभा

0
670

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप ३ नोव्हेंबर रोजी रणशिंग फुंकणार आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी भाजपची सभा होणार आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने भाजपची महाराष्ट्रातील पहिली सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे.