माल्याला मोठा झटका, भारताचा न्यायालयात विजय

0
300

प्रतिनिधी,दि.२० (पीसीबी) : ९००० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी विजय माल्याला आज मोठा झटका बसला. भारताला प्रत्यार्पण करण्यास विरोध करणारी मालयाची याचिका ब्रिटेन मधील उच्च न्यायालयाने आज फेटाळली. 

उद्योगपती विजय माल्यावर ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडविणे व मनी लॉन्डरींग प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. परंतु माल्या सर्वांना गुंगारा देत इंग्लंडला फरार झाला. त्यानंतर भारताने विजय माल्याला भारतात आण्ण्यासाठी प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू केले. या प्रत्यार्पणा विरोधात माल्याने न्यायालयात याचिका दाखल केली . लंडन येथील रॉयल कोर्टातील लॉर्ड जस्टिस स्टीफन इविन आणि जस्टिस एलिजाबेथ लाइंग या दोन सदस्यीय पीठाने माल्याची याचिका फेटाळली. माल्या विरोधात भारतात फसवणूक आणि मनी लॉन्डरींगची केस सुरु आहे. संपुर्ण जग कोरोनाशी लढत असून अनेक ठिकाणी लाॅकडाऊन असतानाच आज सुनावणी घेण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात ब्रिटेन मधील सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाऊ शकते. या निकालामुळे माल्या भोवतीचा फास आवळला गेला आहे.