‌पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या बळीची संख्या २ वर; पुण्यातील रुग्णालयात उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू

0
490

पिंपरी, दि.२०(पीसीबी) – संपूर्ण राज्यभरात तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर काल मध्यरात्रीपासून सील करण्यात आलं आहे. अशातच आता शहरांमध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाबधित महिलेचा आज सोमवारी ( दि. 20) रात्री मृत्यू झाला आहे. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

शहरातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा बळी आहे. या महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. महिलेचे वय  62 होते. निगडी भागात राहणारी ही महिला होती. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला नेमकी कोरोनाची लागण कशी झाली होती, याची माहिती समजू शकली नाही. या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या महिलेवर पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.