माढ्यातून शरद पवारांच्याविरोधात भाजपचा ‘हा’ उमेदवार रिंगणात?   

0
780

सोलापूर, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर त्यांच्याविरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना रिंगणात उतरण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळे पवार – देशमुख यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत देशमुख यांनी  माढ्यातून पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत रिंगणा होते. त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभवाचा सामना करावा लागला होता.

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना ४,८९,९८९ मते मिळाली होती. तर सदाभाऊ खोत यांनी ४,६४,६४५ मते घेतली होती. आता माढा मतदार संघातून पुन्हा एकदा शरद पवारांनी लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळाल्यास ते चमत्कार घडवून आणणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.