महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

0
312

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – महिलेसोबत वारंवार लगट करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना ही घटना 2018 ते 17 जुलै 2021 या कालावधीमध्ये पिंपरी येथे घडली.

नितीन रामदास वेताळे (वय 38 रा. रामनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी पीडित महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला ‘इथून पुढे मला व माझ्या घरच्या लोकांना फोन करून त्रास देऊ नको’, हे समजण्यासाठी गेल्या त्यावेळी आरोपी वेताळे याने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.