पिंपरीत बारा वर्षीय मुलाच्या आत्महत्येने खळबळ; कारण अद्यापही अस्पष्ट

0
327

पिंपरी,दि.१८ (पीसीबी) : बारा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे गुरुवारी (दि. 15) दुपारी उघडकीस आली.

सुशांत तानाजी सरवदे (वय 12, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत मित्रांसोबत खेळण्यासाठी पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ गेला होता. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास त्याने साडीच्या झाडाला साह्याने गळफास घेतला. ही घटना त्याच्या मित्राने घरी येऊन आईला सांगितली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील सुशांत याला खाली उतरून त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सुशांत याने आत्महत्या करावी यासाठी कोणतेही कारण घरात घडलेले नव्हते. त्यामुळे सुशांत हा आत्महत्या करू शकत नाही. त्याचा कोणीतरी घातपात केला आहे, अशी शक्यता सुशांतच्या आई- वडिलांनी व्यक्त केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. सुशांत हा मामाच्या गावी उस्मानाबाद येथे शिकण्यासाठी होता. नुकताच तो आठवीमध्ये गेला होता. लॉगडाऊनमध्ये ऑनलाईन शाळा असल्याने तो आपल्या आई-वडिलांकडे डिसेंबर महिन्यात पिंपरीमध्ये आला होता. त्याच्या मागे आई-वडील एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.