महाविकास आघाडीनं स्थानिक निवडणुकीतही एकत्र लढायला हवं – शरद पवार

0
322

मुंबई,दि.१८(पीसीबी) – भाजपविरोधी वातावरण आता देशात निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्वांना एकत्र यायला हवं. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकत्र लढायला हवं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये बोलत होते.

भाजपला सत्तेसाठी दूर करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. भाजपचे वर्चस्व कमी करण्यासाठी आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढाव्या, अशा सुचना पवारांनी दिल्या आहेत.

जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे. विकास कामांवर लक्ष दिलं पाहिजे, असंही पवार म्हणाले आहेत.