महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव हाणून पाडणार – अजित गव्हाणे

0
236

>> राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राला चुकीच्या दिशेने नेलं जातात आहे. हा कुटील डाव थांबवावा लागेल. मतं मागताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांची नावे घेतात. पण नंतर याच महापुरुषांचा सर्रास अपमान करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम भाजपा करत आहे. मात्र, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाणून पाडणार आहे. यापुढे महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी आंबेडकर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि राज्यपाल कोश्यारी यांचा अजित गव्हाणे यांनी खरपूस समाचार घेतला. आंदोलनात कोश्यारी यांच्या निषेधाची फलके लावून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर मंगला कदम, भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले की , महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. आपल्या महाराष्ट्राचा आदर्श केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये घेतला जातो. लोकांचं राज्य पहिल्यांदा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. अशा आदर्श छत्रपती शिवरायांचा अपमान करणं, चुकीची वक्तव्य करणं हे वारंवार आणि जाणून बुजून भारतीय जनता पक्षाकडून केलं जात आहे. या प्रकाराकडे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदारांनी दुर्लक्ष करण्याऐवजी आपली भुमिका स्पष्ट करावी. कारण मतं मागताना ही मंडळी याच महापुरुषांचे नाव घेतात. सत्तेवर येतात आणि त्यानंतर याच महापुरुषांचा अपमान पाहूनही मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे या लोकांना याबद्दल जाब विचारायलाच हवा.

छत्रपती राज्यपाल कोश्यारी यांनी काही महिन्यांपूर्वीही सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेच अपमानास्पद वक्तव्य केले होते. तेव्हादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन छेडले होते. यापुढेही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पूर्वीपेक्षाही जास्त आक्रमक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार असल्याचे गव्हाणे यावेळी म्हणाले.

राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. सामान्य लोकांना तर राज्यपाल कोण असतात, याबद्दलही जास्त माहिती नसते. मात्र भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना वाट्टेल ते बोलण्याची जणू मुभाच दिल्याचे दिसत आहे. त्यांच्या डोक्यावरील काळ्या टोपीप्रमाणेच त्यांचं मनही काळं आहे. बेताल बडबड करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम राज्यपाल करत आहेत. राज्यपालच नव्हे तर सुधांशु त्रिवेदी, गोपीचंद पडळकर यांच्या जिभेला हाडंच नसल्याचे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून दिसून येत आहे. यापुढे आम्ही असली बेमुर्वत भाषा खपवून घेणार नाही, असा इशारा गव्हाणे यांनी दिला.

या आंदोलनात अजित गव्हाणे, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, फजल शेख मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, कविता आल्हाट, पंकज भालेकर, शाम लांडे अरुण बोऱ्हाडे, इम्रान शेख, वर्षा जगताप, मारुती कांबळे, मानव कांबळे, सुलक्षणा शिलवंत, मोरेश्वर भोंडवे, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, प्रवीण भालेकर, माया बारणे, गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, संजय औसरमलए दत्तात्रय जगताप, मनीषा गटकळ, किरण देशमुख, काशीनाथ जगताप, युसुफ कुरेशी, विनय शिंदे, कविता खराडे, माधव पाटील, विजय पिरंगुटे अकबर मुल्ला, दीपक साकोरे, संगीता कोकणे, ज्ञानेश्वर कांबळे ,सविता दुमाळ, मीरा कदम, शक्रुल्ला पठाण, तानाजी जवळकर, काशीनाथ नखाते, समीता गोरे, इकलास सय्यद, विश्रांती पाडाळे, युवराज पवार, ज्योति गोफणे, निलेश शिंदे, मंगेश बजबळकर, राजेंद्र हरगुडे, ज्योती जाधव विजया काटे, सुदाम शिंदे, उत्तम कांबळे, रामभाऊ आव्हाड, अभिजीत आल्हाट, रवींद्र सोनवणे अनंत सुपेकर, किरण नवले, तृप्ती पवार, तुषार ताम्हाणे, विशाल जाधव, सय्यद रसूल, सचिन औटे, भूपेंद्र तामचिकर, सतीश चोरमले, प्रदीप गायकवाड, दीपक गुप्ता, दिनेश पटेल श्रीकांत कदम, शादाब खान, सुनील कबाडे, विकास गाढवे मीरा कदम,योगीराज सुरकुले अश्विनी तापकीर, रामप्रभू नखाते, निखिल घाडगे,ओम क्षिरसागर,जितू फुलवरे,अमोल बेंद्रे,रुबान शेख,अभिषेक जगताप,दत्ता जगताप,शुभम भालेकर,मयूर खरात,मंगेश बजबळकर, समिता गोरे,प्रसन्न डांगे,युवराज पवार इत्यादी कार्यकर्त्यांचा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.