महापूराच्या संकटात निवडणुकांचा विचार कसा येतो?; उध्दव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

0
439

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महापूराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो? असा   टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांव न घेता  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (रविवार) लगावला .

मुंबईतील पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलत होते. पूरस्थितीमुळे भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी,  अशी मागणी राज ठाकरे यांनी केली पत्रकार परिषदेत केली होती.  यावर उध्दव ठाकरे यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे  म्हणाले, पुराच्या संकटात आपण राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणे गरजेचे आहे. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे. शिवसेना म्हणून जे काही करणे शक्य असेल ते आम्ही करतोच आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना शिवसेनाचा मदतीचा हात आहे.