महापालिका भोसरी, पिंपरीत दोन कचरा स्थानांतर केंद्रे उभारणार

0
225

भोसरी, दि. २९)(पीसीबी) – पिंपरी -चिंचवड शहरातील घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी महापालिका भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक आणि पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी  कचरा स्थानांतर केंद्रे उभारणार आहे. या कामासाठी 9 कोटी 44 लाख रुपये खर्च होणार आहे.

शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे 25  ते 30 ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील ब-याच भागातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हवेचे प्रदुषणही होते. लिचेटची गळती रस्त्यावरून होते. तसेच दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. हे टाळ्ण्यासाठी महापालिकेने  इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  

कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, थेरगाव येथील एम. एम. शाळेजवळील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर 23 – निगडीतील गायरान जागा, भोसरी-नेहरुनगर एमआयडीसी जे ब्लॉक मधील मोकळी जागा या ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. व्यातिरिक्त क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक येथील कचरा स्थानांतर केंद्र व इंडस्ट्रियल रिकव्हरी फॅसिलीटी तसेच पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी मेकनाईज्ड वेस्ट ट्रान्स्फर यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी 10 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्राद्वारे निविदा कार्यवाही कळविण्याबाबत कळविले आहे.

हे ट्रान्स्फर स्टेशन उभारल्यामुळे त्या-त्या भागातील ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी गोळा करुन वर्गीकरणानुसार ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करुन हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. इंधन बचत, हवेचे प्रदुषण कमी, लिचेटची गळती बंद होणे याबाबी शक्य होणार आहेत.

त्यानुसार अशा कामाचा अनुभव असणारे प्रकल्प सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कामाअंतर्गत आवश्यक मेकॅनिकल उपकरणे व विद्युत विषयक बाबींचे अंदाजपत्रक 2018-19 ची दरसुची आणि महापालिकेचे मंजूर दरपृथ्थकरणानुसार बनविण्यात आले. दोन ट्रान्स्फर स्टेशनसाठी भांडवली खर्च, जीएसटी व इतर शुल्क वगळून सुमारे 9 कोटी 44 लाख 39 हजार रुपये इतका येत आहे. या कामाचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.