फुगेवाडीतील पुलाखाली सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची पिंपरी युवासेनेची मागणी

0
276

पिंपरी दि. २९ (पीसीबी) –  प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी पुलाखालील शिवसेना शाखा जवळील परीसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने  पुलाखाली सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत अशी मागणी पिंपरी  युवासेनेने केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,  प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी पुलाखालील शिवसेना शाखा जवळील परीसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. बाजूला रेल्वेहद्द असल्याने त्याठिकाणी मद्यपीसह व्यसनाधीन अल्पवयीन मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चोरी,छेडछाड, धमकावणे,मारामारी यांसारखे प्रकार वारंवार पहावयास मिळतात. स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहर CCTV च्या देखरेखीत करण्याचे काम सुरू आहे.

 त्यास बराच कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी फुगेवाडी पुलाखाली लवकरात लवकर कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, असे  पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांनी निवेदनात म्हटले आहे.