महापालिका कर्मचारी महासंघात एकाधिकारशाही, जातीभेद – महासंघ उपाध्यक्ष अभिमान भोसले यांचा पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

0
385

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघात जातीभेद, एकाधिकारशाही, दडपशाही असल्याचा गंभीर आरोप महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले यांनी केला आहे. याच कारणामुळे महासंघातील पदाधिकाऱ्यांशी आपले वैचारीक मतभेद निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात अप्पर कामगार आयुक्त यांच्याकडे नकली (बनावट) राजीनामा पाठविण्यात आला असून त्याला भोसले यांनी जोरदार हरकत घेतली आहे.

महापालिकेतील सात हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारी ही संघटना आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकित प्रस्थापितांचा दारून पराभव करून नवीन पदाधिकारी निवडूण आले. अवघ्या पाच महिन्यांत अगदी टोकाचे मतभेद निर्माण झाल्याने महासंघात फूट पडल्यासारखी आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांत खळबळ आहे. भोसले यांच्या पवित्रामुळे कर्मचाऱ्यांतही गट पडले आहेत.

अप्पर कामगार आयुक्त यांना दिलेल्या पत्रात भोसले म्हणतात, कर्मचारी महासंघाची निवडणूक २० जानेवारी २०२० रोजी झाली. त्यात उपाध्यक्षपदासाठी बहुमताने निवडूण आलो. महासंघ निवडणुकिनंतर एका कर्मचाऱ्याला महापालिका कामात हलगर्जीपणा केला म्हणून निलंबित करण्यात आले. यात महासघाची नाहक बदनामी होत असल्याचे अध्यक्ष यांना वाटले म्हणून त्यांनी सर्व पदाधिकारी यांचे राजीनाम लिहून घेतले. असे करण्यामागे महासंघाची बदनामी होऊ नये हा होता. मी राजीनामा देताना फक्त नाव, पत्ता दिला होता, त्यावर मी स्वाक्षरी केलेली नाही. सदरची स्वाक्षरी बनावट असून माझी व मला निवडूण देणाऱ्या सभासदांची ही फसवणूक आहे. राजीनामा दस्तावरील माझी स्वाक्षरी पडताळणी केली असता ती बनावट असल्याची खात्री पटेल, असे भोसले यांनी म्हटले आहे.

महासंघाचे अध्यक्ष मनमानी, एकाधिकारशाहीने काम करत असून घचनेची पायमल्ली करत असल्याचे दिसते. माझ्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मी राजीनामा दिला आहे असे सांगून माझी बदनामी करतात. वास्तविकतः मी निवडणू आलेलो असताना यांना मला पदावरून काढण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
भोसले यांनी आपल्या पत्रात आणखी गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, महासंघात निवडूण आलेल्या पदाधिकारी व सदस्यांत कर्मचाऱ्यांना मारहाण, दमबादी व जीवे मारण्याची धमकीच्या तक्रारी आहेत. त्यामुळए माझ्याही जीवाला धोका निर्माण झाला असून मला होणाऱ्या भविष्यातील अनिष्ट प्रकारास याच व्यक्ती जबाबदार असतील. त्यामुळे त्यांनी सादर केलेला राजीनामा फसवणूक करून दिलेला असल्याने तो मंजूर करू नये, अशी विनंती केली आहे.