महाआघाडीत मनसेला स्थान नाही; राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

0
828

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  आगामी निवडणुकीत मनसे महाआघाडीत नसेल, मनसेने आघाडीत येण्याबाबत चर्चा झाली. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी  आज (शुक्रवार) स्पष्ट केले आहे.

आगामी निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादीची आघाडी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी (दि.२५) एकत्र विमानप्रवास केला. त्यामुळे या चर्चांना जोर आला होता.

दरम्यान, मनसेला आघाडीत  घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मनसेला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे,  असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी  महटले होते. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असे निरुपम यांनी स्पष्ट केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे.