मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन; आंदोलकांमध्ये दुफळी

0
360

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा बांधवांनी आंदोलन पुकारले आहे. परंतु आंदोलक मराठा बांधवांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा असे दोन गट पडले आहेत. आंदोलकांमध्ये फूट पडल्यामुळे दोन्ही गटांकडून  एकमेकांवर टीका-टिप्पणी  सुरू आहे.