मनसे म्हणजे मतदार आणि उमेदवार नसलेली सेना; भाजपचा व्यंगचित्रातून फटकारा  

0
490

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मनसे म्हणजे मतदार आणि उमेदवार नसलेली सेना आहे, अशी टीका भाजपने  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक व्यंगचित्र ट्विट करून केली आहे. राज ठाकरे मोदींच्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत, या पार्श्वभूमीवर भाजपने निशाणा साधला आहे. 

भाजपने तीन व्यंगचित्र  दाखवत  राज ठाकरेंना फटकारे मारले आहेत.  मनसेकडे सुरूवातीला १३ आमदार होते, असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर २०१४ असे लिहून तेच व्यंगचित्र दाखवण्यात आले आणि १३ पैकी एकच आमदार दाखवून मतदार नसलेली सेना म्हणजे मनसे असा अर्थ लिहिण्यात आला आहे. तर २०१९ मध्ये राज तेच व्यंगचित्र दाखवले आणि त्यात राज ठाकरे एकटे पडले आहेत एक चाकी सायकलवर ते बसले आहेत, असे दाखवण्यात आले आहे.

१३ उमेदवार असताना राज ठाकरे यांना रथात बसलेलं दाखवण्यात आलं आहे. १ आमदार उरल्यावर त्यांना एका हातगाडीवर बसलेले दाखवण्यात आले आहे तर २०१९ मध्ये म्हणजेच सद्यस्थिती राज ठाकरेंकडे फक्त एका चाकाची सायकल उरली आहे असे दाखवण्यात आले आहे.  दरम्यान, या टीकेला राज ठाकरेंकडून कसे उत्तर दिले जाणार हे  पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.